
मुरुड - घरात झोपलेल्या शाळकरी मुलीस दारू पिऊन घरात घुसून वाईट हेतूने मिठी मारल्याची घटना करकट्टा, ता. लातूर येथे शुक्रवार ता. 21 फेब्रुवारी रोजी चारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की गातेगाव ता लातूर येथील शाळकरी मुलगी मुरुड येथील शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. ती आत्याकडे करकटा, ता. लातूर येथे राहते. सध्या दुपारी शाळेला सुट्या आहेत. ता. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास ती घराचा दरवाजा पुढे करून झोपली होती.
त्यावेळी गावात राहणारा आरोपी दिनेश गौतम गायकवाड हा दारू पिऊन घरात आला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत त्याने सदरील मुलीस वाईट हेतूने मिठी मारली. मुलीने आरडाओरड केल्यानंतर मुलीचे मामा घरी आले. त्यावेळी दिनेश गायकवाड यांने मोबाईल घ्यायला आलो होतो, असे सांगून निघून गेला.
रात्री पीडित मुलीची आई, मामा व इतर नातेवाईक तक्रार देण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्यात आले त्यावेळेस आरोपीही त्या ठिकाणी आला होता. गावातील लोकांनी समजावून सांगितल्याने ठाण्यात फिर्याद दिली नाही.
आज शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सदरील मुलगी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेतून परत जात असताना करकट्टा पाटीच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर गावातीलच विशाल गोरोबा आल्टे हा मुलीच्या जवळ आला. त्याने या मुलीस पोलीस ठाण्यात का गेलीस? यानंतर गेलीस तर तुला जीवे मारतो अशी धमकी दिली.
मुलगी घरी आली असता परत त्या ठिकाणी विशाल त्याला व त्याने मुलीस तिच्या आईला व मामाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यानंतर फिर्यादी मुलगी व तिचे नातेवाईक मुरुड पोलीस ठाण्यात आले.
या ठिकाणी मुलीच्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यात आरोपी दिनेश गौतम गायकवाड व विशाल गोरोबा आल्टे यांच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय हनुमंत नागरगोजे हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.