Latur Crime : लातूरला चोरीच्या सात बुलेट जप्त; दोघे गजाआड
Motorcycle Theft : लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघांना अटक करून लातूर, बीड, धाराशिव आणि पुणे येथून चोरलेल्या सात बुलेट मोटारसायकली जप्त केल्या. चोरीच्या सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
लातूर : बुलेट, मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लातूर, पुणे, बीड व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या सात बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. यात सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.