कळंब - आठवडाभरापासून शहरातील द्वारकानगरीतील मनिषा कारभारी बिडवे (वय-40) या महिलेच्या खून प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी रामेश्वर उर्फ रामया माधव भोसले व उस्मान गुलाब सय्यद या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मंगळवार (ता. 1) सकाळी अटक केली. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरील दोन्ही संशयित आरोपी बीड जिल्ह्यातील असुन सदरील महिलेच्या खुनाचे धागेदोरे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जुळत असल्याचे काल अंजली दमानिया यांनी ट्विट केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. संशयित आरोपींच्या अटकेनंतर पोलीस तपासात काय निष्पन्न होते हे महत्त्वाचे आहे.
शहरातील द्वारका नगरी कॉलनीत राहणाऱ्या मनीषा बिडवे-कारभारी या महिलेचा तिच्या राहत्या घरात 27 मार्च रोजी सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी घरातून मृत्यू देह काढून शवविच्छेदन करून आकास्मित मृत्यूची नोंद केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनैतिक संबंधातून व आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे उघड झाल होत. परळी रस्त्यावरील द्वारका नगरीत राहणाऱ्या मनीषा कारभारी बिडवे या महिलेचा 27 मार्च रोजी तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.या महिलेचे संतोष देशमुख यांच्या हत्याशी महिलेचे कनेक्शन असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत या महिलेच्या डोक्यात लोखंडी घण घालून आर्थिक व्यवहार व अनैतिक संबंधातून खून झाला असे स्पष्टीकरण पोलिसांनी प्रेसनोट द्वारे दिले आहे.संतोष देशमुख हत्येप्रकरणाशी देखील संबंधित महिलेचे नाव जोडले जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या महिलेचं संतोष देशमुख प्रकरणाशी नाव जोडलं असून, हत्येबाबत शंका उपस्थित केली आहे. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी हा दावा फेटाळला आहे. कळंब शहरातील द्वारका नगरी कॉलनीत मागील काही वर्षांपासून मनीषा कारभारी-बिडवे (वय 40 ) महिला राहत होती. ती एकटीच राहत होती.
ती मूळची बीड जिल्ह्यातील आडस गावची राहणारी होती. अचानक 27 मार्च रोजी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तिच्याच घरात आढळून आला. आता तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.पोलिसांना काही रेकॉर्डिंग आणि पुरावे सापडले आहेत.
ज्याच्या आधारे पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली. आरोपीला पकडल्यानंतर तपास करून रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल. तोपर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली.
मनीषा बिडवेची हिस्ट्री काय?
मागील काही वर्षांपासून संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी करत असल्याची देखील माहिती मिळतेय. काही लोकांचा तिच्या घरी येणंजाणं होतं. रात्री अपरात्री कधीही कोणी तिच्या घरी येत असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची. १) मनीषा आकुसकर आडस, २) मनीषा बिडवे कळंब, ३) मनीषा मनोज बियाणी कळंब, ४) मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, ५) मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी, अशी माहिती अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. त्यामुळे आता नेमके सत्य काय हे आरोपीला पकडल्यानंतरच समोर येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.