Latur News : रेणा साखर कारखान्यास ‘व्हीएसआय’चे दोन पुरस्कार

आर्थिक व्यवस्थापनासह सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेत बाजी
latur
latursakal
Updated on

रेणापूर : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ‘व्हीएसआय’ संस्थेकडून देण्यात येणारा राज्य पातळीवरील आर्थिक व्यवस्थापनाचा तसेच उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार रेणा सहकारी साखर कारखान्यास माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ११) प्रदान करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक तथा माजीमंत्री दिलीपराव देशमुख व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, माजी आमदार ॲड. त्रिंबक भिसे, रेणाचे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे आदी उपस्थित होते.

निवाडा (ता.रेणापूर ) येथे उजाड माळरानावर रेणा साखर कारखान्याची उभारणी झाली. या साखर कारखान्याने कमी दिवसात उभारणी करून काही वर्षातच कर्ज मुक्त होण्याचा मान मिळवला आहे. कारखान्यास आजपर्यंत देश व राज्य पातळीवरील विविध १३ पुरस्कार प्राप्त केले आहेत. मागील गळीत हंगामात साखर कारखान्याने विस्तारीकरण केले.

कमी दिवसात जास्तीचे गाळप व कारखान्याने केलेले आर्थिक नियोजन उत्पादन प्रक्रिया खर्च, जास्तीचा ऊस दर यासर्व बाबींची दखल घेत उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा व सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे असे दोन प्रथम पुरस्कार पटकाविले आहेत.

पुणे येथील पुरस्कार सोहळ्यास कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, प्रेमनाथ अकनगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी , स्नेहल देशमुख, सतीश पाटील, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.भोसले, चीफ केमिस्ट एस.आर.मोरे, डिस्टलरी प्रकल्प प्रमुख डी. बी.देशमुख, मुख्य अभियंता डी. एल. पतंगे, चीफ अकाउंटंट एम. एस. निंबाळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com