सेलू - सेलू-वालूर रस्त्यावरून दुचाकीवरुन जात असलेले दोघेजण राजेवाडी गावाजवळील दूधना नदीच्या पुलावरुन जाणाऱ्या पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (ता. १९) चारच्या सुमारास घडली. निम्न दुधना प्रकल्पातून आठ दरवाजामधून सोमवारी (ता. १८) दुधना नदीपात्रात जवळपास ६ हजार पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीला पूर आला.