
पाचोड : येथुन बुधवारी ( ता.१६) शेतकऱ्या ने गोठ्यात बांधलेले एक लाख तीस हजार रुपये किंमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेले होते.या प्रकरणी पाचोड (ता .पैठण) पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंबंधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून रविवारी (ता.२०) गुरे चोरणाऱ्या टोळीच्या दोघां म्होरक्यास मोठ्या शिताफिने अटक केली आहे.