Kalamb Crime News : जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत व जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. यात ९० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
crime theft
crime theftsakal

कळंब : तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत व जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. यात ९० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

धाराशिव येथील आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगर मधील तावडे प्लॉटिंग अभिषेक बाबुराव मारवाडकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २४.५ ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरीची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करून तपास सुरु होता.

यात तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले जात होते. चोरीच्या प्रकरणातील गुन्ह्याच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक येरमाळा,अंबी,वाशी, भूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,दरम्यान आंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले (वय - ३१) रा.बेलगाव ता.कर्जत,जिल्हा अहमदनगर व शाम उत्तम पवार (वय - ३२) रा. पाचंग्री ता.पाटोदा जिल्हा बीड याना ताब्यात घेतले.बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

या दोन संशयितांना आंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेऊन चौकशी केली.ईश्वर भोसले यानी सांगितले की,मी व माझे तीन भाऊ यानी मागील दीड वर्षाच्या कालावधीत दुचाकीवरून धाराशिव येथील दिवसा बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरले व येरमाळा,वाशी, भूम, आंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत साथीदारासह मिळून चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

गुन्ह्यात चोरलेला मुद्देमालांपैकी ९० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलिस अंमलदार शौकत पठाण, जावेद काझी,फरहान पठाण,प्रकाश औताडे,नितीन भोसले,रत्नदीप डोंगरे यांनी ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com