esakal | हिंगोलीत पुन्हा दोन ‘कोरोना’ संशयित आढळले
sakal

बोलून बातमी शोधा

korona
जिल्ह्यात पुन्हा दोन ‘कोरोना’ संशयित आढळून आले आहेत. फिलिपाइन्स येथून आलेल्या संशयितावर हिंगोली जिल्‍हा सामान्य रुग्णालयात; तर पुणे येथून आलेल्या संशयितावर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी दोन जणांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ खबरदारी म्हणून संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत.

हिंगोलीत पुन्हा दोन ‘कोरोना’ संशयित आढळले

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर
हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा दोन ‘कोरोना’ संशयित आढळून आले आहेत. फिलिपाइन्स येथून आलेल्या संशयितावर हिंगोली जिल्‍हा सामान्य रुग्णालयात; तर पुणे येथून आलेल्या संशयितावर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘कोरोना’चा रुग्ण अद्याप आढळला नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीने संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांवर उपचार करण्यात आले. दोघांचेही रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

हिंगोली जिल्ह्यात ‘कोराना’चा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना घेतली जात असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. फिलिपाइन्स येथून आलेल्या एका संशयिताला बुधवारी (ता. १८) येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचे स्वॅब नमुने घेऊन पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहेत. केवळ संशयित म्हणून दाखल केले असून तपासणी केली असता ताप, खोकला आढळून आले नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

हेही वाचावारंगा फाटा येथे गव्हाचा ट्रक पेटला ​

कोरोनाचा एकही रुग्ण नाही

दुसऱ्या संशयितास कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसरा संशयित पुण्याहून आला आहे. दोन्ही संशयितांना कोरोना झाला नसून केवळ खबरदारी म्हणून उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर झाल्याने पुणे, मुंबई येथून विद्यार्थी, कामानिमित्त गेलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत.

यापूर्वी दोघांचे रीपोर्ट निगेटिव्ह

जिल्ह्यात यापूर्वी दोन संशयितांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे येथे स्वॅब नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी आरोग्य विभाग दक्ष असून खबरदारीच्या उपाययोजना राबवित आहे. राज्यभरात ‘कोरोना’चा प्रसार झपाट्याने होत आहे. प्रशासन खबरदारी घेत असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करत आहे.

येथे क्लिक करा ‘कोरोना’च्या धास्तीमुळे गावकरी, विद्यार्थी परतले ​

शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंद

जिल्हा प्रशासन खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीचे ठिकाणे असलेल्या शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्या दिल्या आहेत. औंढानागनाथ येथील नागनाथ मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच आठवडे बाजारही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. 
 
loading image
go to top