उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय, आता दोन दिवस...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 30 व 31 मे रोजी जिल्ह्यात जनता कर्फ्यूचे आदेश दिले असून, नागरिकांनी घरांमध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. त्याच काळामध्ये लॉकडाउनदेखील शिथील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता गृहित धरून दोन दिवसांची जनसंचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यानी हा आदेश जारी केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु, नागरिकांकडून आणखीही या उपाययोजनाना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही.

अनेक नागरिक घराबाहेर पडत असून, शिवाय नियमाचेही उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 30 व 31 मे रोजी जिल्ह्यात जनता कर्फ्यूचे आदेश दिले असून, नागरिकांनी घरांमध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
 

यांना सूट

या जनता कर्फ्यूदरम्यान 30 व 31 मे रोजी रुग्णालये, औषधी दुकाने व दूधविक्रीचे दुकानेच चालू राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासाठी फक्त पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. बाकीच्या सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असेही जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गबाबत अधिक जागरुक होऊन प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन घरामध्येच कुटुंबियासह थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

येत्या काळात ऑफिसेसमध्ये करावे लागतील हे बदल, कारण....
 
उस्मानाबादच्या युवकाने तयार केले निर्जंतुकीकरणाचे मशीन

उस्मानाबाद : कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. देशासह राष्ट्रीय पातळीवर संशोधन सुरू आहे. मुंबई आयआयटीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनिकेत काळे याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन विकसित केले आहे. अगदी माफक दरामध्ये आणि साध्या पद्धतीमध्ये हे मशीन असून त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.कोरोनाचा फैलाव एकापासून दुसऱ्याकडे अगदी झपाट्याने होतो. त्यामुळे त्याचा फैलावही राज्यासह देश आणि जगात मोठ्याने वाढत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स असे विविध प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाचा फैलाव अगदी कोणत्याही वस्तूद्वारे होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-day public curfew at Osmanabad