Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के; भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंद

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
Hingoli earthquake

Hingoli earthquake

esakal

Updated on: 

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी हलका धक्का बसल्यानंतर पावणेदहा वाजता पुन्हा मोठा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा तालुक्यात भूकंपाचे सातत्याने धक्के बसत आहेत. नेहमीच पांगरा शिंदे परिसरात जमिनीतून गूढ आवाज येणे, जमीन हलणे हे प्रकार होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com