Electric Shock : परंडा तालुक्यात एकाच दिवशी विजेच्या धक्क्याने दोन मृत्यू, नागरिकांत चिंता
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जाकेपिपरी व मुळेवाडी या गावांमध्ये ही दुर्घटना घडली.
परंडा (जि. धाराशिव) : तालुक्यातील जाकेपिपरी येथे विजेच्या खांबावरील स्वीच बंद करताना विजेचा जबर धक्का लागून भैरवनाथ लांडगे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला.