लोअर दूधना धरणाचे दोन दरवाजे उघडले

दूधना नदी पात्रात २३५७ क्युसेसने पाण्याचा विसर्ग
Two gates of Lower Dudhna Dam opened
Two gates of Lower Dudhna Dam opened
Updated on

सेलू (जि. परभणी) - लोअर दूधना प्रकल्प धरणात स:द्यस्थितीत जीवंत साठा १७१.६०३ दलघमी असून जीवंत साठा टक्केवारी ७०.८५ इतका आहे. लोअर दुधना प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता बुधवारी ( ता. २७ ) रोजी सकाळी आठ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे प्रत्येकी ०.३५ मीटरने उघडण्यात आले असून दूधना नदी पात्रात २३५७ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

त्यामुळे दूधना नदी पात्रातील पाणी पातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नदी काठच्या गावांना सतर्क राहण्या बाबत तसेच नदी पात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तत्काळ काढून घेण्याबाबत तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. या बाबत संबधित गावांना महसूल विभागामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marriage Fraud
Children of endlife-Affected Farmers from Ardhapur Taluka Pay an Inspiring Visit to NDA
Village Pride Shines in Moscow: Dr. Abhishek Borude Completes MBBS in Russia
Centuries-Old Heritage Under Threat; Preservation Plea for Ardhapur’s Historic Artifacts
Marathi News Esakal
www.esakal.com