पोलिस ठाण्यातच त्या दोघांचा विवाह, वाचा नेमके काय घडले

Wedding In Police Station Renapur News
Wedding In Police Station Renapur News

रेणापूर (जि.लातूर) : प्रेमी युगलांचा विवाहाचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत आला. पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर रेणापूर पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी (ता.२७) सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी गोरजमुहुर्तावर या प्रेमी युगलांचा विवाह झाला. याबाबत रेणापूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी, रोहित ज्ञानोबा पुजारी (वय२४) व प्रतिक्षा श्रीमंत व्यवहारे (वय २०, दोघेही राहणार धनगर गल्ली, रेणापूर) यांचे दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते.

दोघेही एकाच समाजाचे असल्याने या दोघांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरुण शाब्दिक भांडणे होत होती. असाच वाद मंगळवारी (ता.२६) दोन्ही कुटुंबात झाल्यानंतर हे प्रेमीयुगुल पोलीस ठाण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक गोरख दिवे व सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार गुळभिले यांनी दोघांच्या आई वडीलांना बुधवारी (ता.२७) पोलिस ठाण्यात बोलावून घेतले व दोघांच्याही आई वडीलांचे मत परिवर्तन करुन दोघेही सज्ञान असल्याने त्यांचा विवाह पोलिस ठाण्याच्या आवारात दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लावण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

फेसबुकवरून जवानाची आर्थिक फसवणूक, चाळीस हजार खात्यावर पाठविले

वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती
उजनी (जि.लातूर) : मे महिना संपत आला आहे; मात्र गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा चढला असल्याने उजनी (ता. औसा) परिसरातील ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. अचानक तापमानाचा पारा वाढल्याने घरात बसणे अशक्य झाले आहे. कोरोनामुळे घरात बसण्याची सक्ती असताना आता उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले आहेत.

मध्यंतरी अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला होता; परंतु या परिसरातील तापमान मागील काही दिवसांत ४३ अंशांपर्यंत पोचल्याची नोंद झाली आहे. या वाढत्या उष्णतेपासून मुक्या जनावरांना त्रास होत आहे. शेतातील पिके तसेच झाडांची पाने तीव्र उन्हामुळे कोमेजून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. उजनीतील तेरणा नदीच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून १५ ते २० हरणांचा कळप दिसून येत आहे. कडक उन्हाळ्यामुळे या वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com