
वसमत : वसमत ते निळा मार्गावर पिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ता. ८ पहाटे ४ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी रॉड, चोरीची दुचाकी व इतर साहित्य जप्त केले आहे.