Unseasonal Rain : भोकरदनमध्ये वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
Jalna News : जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. कोठा कोळी गावातील युवकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
जालना : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात वीज अंगावर कोसळून दोन जण ठार झाले. गणेश प्रकाश जाधव (वय ३५), सचिन विलास बावस्कर (वय २८, दोघे रा. कोठा कोळी, ता. भोकरदन) अशी मृतांची नावे आहेत.