
वसमत : वसमत- मालेगाव रोडवरील कन्हेरगाव शिवारात हाँटेल राजरसोई समोर दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार ता.२६ रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. तर सोमवार ता.२७ सकाळी ११ वाजता वसमत परभणी रोडवर खांडेगाव शिवारातील नायरा पेट्रोल पंपासमोर पिकअप वाहनाने उभ्या दुचाकीला धडक दिल्याने बापलेक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.