
केज : टेंपो-जीपच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना केज-मांजरसुंबा मार्गावरील सांगवी (सारणी) जवळ शुक्रवारी (ता. सात) सकाळी घडली. मुलीच्या विवाहाचा बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या वधूपित्यासह वराच्या नातेवाईक महिलेचा मृतांत समावेश आहे. काका-पुतण्या गंभीर जखमी आहेत.