वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या अपघातात दोन ठार

हबीब पठाण
बुधवार, 9 मे 2018

पाचोड (औरंगाबाद) - पंढरपुर येथून देवदर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला बीडकडे दुध घेऊन जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने नवऱ्यामुलासह त्याची बहीण जागीच ठार झाले. तर नवरीसह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. 

खेडगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील गोडसे कुटुंबातील अमीत शंकर गोडसे (वय २२) याचा शुक्रवारी (ता.चार) विवाह झाला होता. विवाहानंतर नवदांपत्य अमित आणि आश्विनी देवदर्शनासाठी पंढरपुर, तुळजापूर आदी ठिकाणी गेले होते. यावेळी गाडीत नवऱ्यामुलाची   बहीण वंदना शिवाजी चौधरी (वय ३० वर्ष), मेहुणा -शिवाजी नारायण चौधरी (वय ३५, दोघे रा.चिकनगाव, ता.जि.जालना), ज्योत्स्ना जनार्धन गोर्डे (वय २१,रा. खेडगाव, ता. अंबड) हे देखील होते.  

अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, उपस्थितांच्या मदतीने सर्वांना उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पाचोड व गोंदी
पोलिस सयुक्तरित्या करीत आहे. 

Web Title: Two killed in road accident in pachoda