Truck Car Collision : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नळदुर्ग (जि. धाराशिव) : ट्रक-कारच्या धडकेत दोन जण ठार, तर तीन जण गंभर जखमी झाल्याची घटना सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील (क्रमांक ६) येथून जवळच गुरुवारी (ता. चार) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.