
भोकरदन (जि.जालना) : हरवलेल्या एटीएमबाबत तक्रार करण्यासाठी गुगलवरून मिळविलेल्या क्रमांकावर कस्टमर केअरला फोन करणे भोकरदन येथील तरुणाला चांगलेच महागात पडले. सायबर चोराने फसवणूक करून तरुणाच्या खात्यावरून दोन लाख रुपयांची रक्कम लांबवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील योगेश लक्ष्मणराव दळवी (वय ३०) हा तरुण मागील आठवड्यात रायगड (Raigad) जिल्ह्यात फिरण्यासाठी गेला होता. या ठिकाणी त्याचे भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank Of India) एटीएम गहाळ झाले. घरी आल्यानंतर ही बाब योगेशच्या लक्षात आली. त्यामुळे या बाबत तक्रार करण्यासाठी त्याने १३ फेब्रुवारीला गुगलवर (Google) कस्टमर केअरचा नंबर शोधला व मिळालेल्या नंबरवर फोन लावला. (Two Lakh Rupees Stolen Through Online From Bokardan Youth Bank Account In Jalna)
मात्र, आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्याचे कारण करून कस्टमर केअरने दुसऱ्या क्रमांकाहुन योगेशला फोन केला व मोबाईलमध्ये एक अप्लिकेशन डाउनलोड करायला लावले. त्यात नाव, मोबाईल क्रमांक व इतर माहिती भरून घेतली. त्यांनतर काही वेळाने दुपारी बँकेच्या खात्यातून ५० हजार काढून घेतल्याचा संदेश योगेशला आला. त्यामुळे योगेशने ताबडतोब पुन्हा कस्टमर केअरला फोन केला. कस्टमर केअरने पुन्हा दुसऱ्या क्रमांकाहुन फोन करून तुमचे बँक खाते बंद करतो म्हणून सांगितले. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी १४ फेब्रूवारीला योगेशच्या खात्यातून दोन तीन वेळेस पैसे काढल्या गेले. असे सर्व मिळून एकूण दोन लाख रुपयांची आपली ऑनलाईन फसगत झाल्याचे योगेशच्या लक्षात येताच त्याने भोकरदन (Bhokardan) पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करित आहेत.(Jalna)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.