Organ Donation: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी दोन लोकांचे देहदान, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी मोलाची मदत
Medical Research : धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन लोकांनी देहदान केले. यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला मोठा हातभार लागणार आहे. या सामाजिक कार्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात मोलाचा विकास होण्याची शक्यता आहे.
धाराशिव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी (ता. सात) दोघांचे देहदान करण्यात आले. या समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोलाची मदत होणार आहे.