Bidkin News : परप्रांतीय २ कामगारांचा शेततळ्यात बुडुन मृत्यू; मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश

घरात फर्निचरचे काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांचा शेतातील शेततळ्यात पडुन जागीच मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली.
Two Migrant Workers Drown in Farm Pond
Two Migrant Workers Drown in Farm Pondsakal
Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - पैठण तालुक्यातील म्हारोळा गावालगत असलेल्या शेतवस्तीवरील घरात फर्निचरचे काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांचा शेतातील शेततळ्यात पडुन जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज (ता.०३) रोजी सायंकाळी वेळी उघडकीस आली आहे.

कामगार प्रल्हाद ओम पुरी (वय-३० वर्षे), राम किशोर जांगिड, (वय-२८ वर्षे), दोघेही रा. रिहमवाडी, राजस्थान, हल्ली मुक्काम, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर असे शेततळ्यात बुडुन मृत्यू झालेल्या इसमांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हारोळा, ता. पैठण शिवारातील ॲड. नंदकिशोर जयराम पाहुणे पाटील यांच्या गट क्रमांक २०६ मधील शेतात बांधलेल्या घरातील फर्निचरचे काम परप्रांतीय (राजस्थानी) कामगार हे मागील काही दिवसांपासून करत होते.

त्याचप्रमाणे आज (ता. ०३) रोजी दुपारच्या वेळी घराचे दरवाजे व इतर काम करून जेवन करत शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला असावा, यातच शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा हि शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ॲड. पाहुणे पाटील यांच्या शेतात काम करत असलेल्या इतर कामगारांनी शेततळ्यात या दोन्ही कामगारांपैकी एकाचा हात पाहिला असता आरडाओरडा करत या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके, पोलिस नाईक योगेश नाडे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत दोन्ही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर बाहेर काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com