Parbhani Court : तहसीलदारास मारहाणप्रकरणी; दोघांना सहा महिन्यांची शिक्षा
Parbhani News : वाळू उत्खननाच्या कारवाईदरम्यान तहसीलदार श्याम मदनुरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या राजू साळुंखे व राजू जटाळे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात ९ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
परभणी : अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या टिप्परवर कारवाई करणाऱ्या तहसीलदारास मारहाण केल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची शिक्षा शुक्रवारी (ता.दोन) जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.