सहावीच्या मुलीवर शिक्षकांचा सामुहीक बलात्कार

file photo
file photo
Updated on

नांदेड : दोन शिक्षकांनी एका सहावीतील विद्यार्थीनीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ दाखवितो म्हणून तिला शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने जिल्ह्यासह राज्य हादरले. अत्याचाराचा धक्का सहन न झाल्याने पिडीत बालिकेला अर्धांगवायू झाला असून तिच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना गेल्या महिन्यात ता. १७ डिसेंबर २०१९ रोजी शंकरनगर (ता. बिलोली) येथे घडली. या घटनेचा विविध संस्था, संघटनांनी सोमवारी (ता. १९) निषेध व्यक्त करत शंकरनगर भागात शैक्षणिक संस्था बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला.  

पाच जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी एक महिन्यानंतर रामतीर्थ पोलिस ठाण्यात त्या दोन शिक्षकांसह, इतर दोन आणि एका महिलेवर अत्याचार, बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध आणि अनुसुचीत जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना
शंकरनगर (ता. नायगाव) येथे श्री साईबाबा विद्यालय कार्यरत आहे. या विद्यालयात सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तेथील दोन शिक्षकांनी संगनमत करून एका खोलीत नेले. आपल्या शाळेत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ दाखवितो. असे म्हणून तिला खोलीत नेऊन अश्‍लिल चित्र दाखवत शिक्षक रसुल सय्यद आणि दयानंद राजूळे यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बेशुध्द झालेल्या विद्यार्थीनीला नेऊन तिच्या घरी सोडले. कामाला गेलेली तिची आई सायंकाळी घरी आली. तेव्हा मुलगी रडत होती. हे पाहून तिला धक्का बसला. त्यानंतर घडलेला प्रकार शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके यांनी पिडीत विद्यार्थीनीच्या आईने सांगितला. त्याबाबत दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. 

विद्यार्थिनीची प्रकृती खालावली
विद्यार्थीनीची प्रकृती खालावत चालल्याने हतबल झालेल्या आईने आपल्या समाजाच्या काही प्रतिष्ठित लोकांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणात शिक्षक रसुल सय्यद, दयानंद राजूळे, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके आणि स्वयंपाकी सुरेखा बनसोडे यांच्याविरुध्द अत्याचार, बाललैंगीक अत्याचार आणि ॲट्रासीटी ॲक्टनुसार रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्‍वर धुमाळ करत आहेत.

विविध संघटनांनी केला निषेध
या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महांसघ, लोकस्वराज्य यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. संबंधितांना निलंबीत करून त्यांच्यावर कडक शासन करावे, अशी मागणी केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे पवित्र शिक्षण क्षेत्र बदनाम झाले आहे. यातील सर्व आरोपी फरार आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमेश्‍वर शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे पथक आरोपीच्या शोधात आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com