

Latest Marathwada News: ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत राशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे कंबरडेच मोडण्याची मोहीम जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. काल रामतीर्थ येथे एक तांदळाचा टेंपो पकडला असतांनाच कालच रात्री (ता.१४) उमरी तळेगांव रोडवर गहू व तांदळाचे दोन ट्रक विशेष पथकाने पकडले आहेत.
संशयित राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक किमंती अंदाजे ४५ लाख रुपयाचा मुद्देमाल उमरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून तळेगांव येथीलच माफीया राशनच्या धान्याच्या काळाबाजाराचे राँकेट चालवत होता असे बोलल्या जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील राशनच्या धान्याचा काळाबाजार बंद करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून जिल्हाभर मोहीम राबवण्यात येत आहे.