
बीड : ‘आमच्या गाडीला कट का मारला?’ असे विचारत दुचाकीस्वार तरुणांचा पाठलाग करुन जीपने धडक दिल्याची घटना रविवारी (ता. २९) जुन्या शहर पोलिस ठाण्यासमोर घडली. यात दोघे युवक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.