उदगीर रेल्वेस्थानकाचा कायापालट

मालधक्का, विद्युतीकरणासह मिळाल्या अनेक सुविधा
Udgir Railway Station
Udgir Railway Station

उदगीर : केंद्र सरकारचे धोरण. उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षात येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला आहे. माल धक्का विद्युतीकरणासह अनेक सुविधा निर्माण झाल्याने उदगीर हे देशभराशी जोडले जात आहे. येत्या वर्षभरामध्ये प्रस्तावित असलेल्या अनेक योजना कार्यान्वित होणार असल्याने उदगीर रेल्वेचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

मराठवाड्यात इंग्रज काळापासून हैदराबाद -परळी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे. या भागात अनेक वर्षापासून कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्या व काही ठराविक प्रवासी गाड्या वगळता फारसा विकास होऊ शकला नव्हता. गेल्या पंधरा वर्षापासून हळूहळू अनेक सुविधा निर्माण होत आहेत. केंद्र शासनाच्या रेल्वे विकास धोरणानुसार व येथील रेल्वे संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दहा वर्षापासून उदगीर रेल्वे स्थानकाच्या विकासासह प्रवासी व मालगाड्यांच्या अनेक फेऱ्या सुरू झाल्या.

सध्या येथील स्थानकावरून साखर, सोयाबीनची वाहतूक सुरू झाली आहे. रेल्वे स्थानकावर काही पायाभूत सुविधाही झाल्या आहेत. यशवंतपूर लातूर मार्गे उदगीर, बिदर मुंबई मार्गे उदगीर या रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. तिरुपतीसाठी विशेष गाड्याही सुरू झाल्या आहेत. सुविधांयुक्त दोन प्लॅटफॉर्म कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. रेल्वे विभागाने येथील स्थानकावर रॅक पॉइंटला मंजुरी दिली असून राज्य शासनाकडून लवकरच ती मिळणार आहे.

खानापूर- लातूररोड या तिसऱ्या टप्प्याच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून चाचणी नुकतीच झाली आहे. लातूर रोड- परळी या चौथ्या टप्प्याच्या विद्युतीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे.

उदगीर रेल्वेच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील रेल्वे विभागाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.उर्वरित प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

- मोतीलाल डोईजोडे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com