

Latur LCB Crackdown: Contraband Gutka Worth ₹8 Lakhs Seized in Udgir
Sakal
उदगीर, (जि.लातुर) : स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकाने उदगीर तालुक्यात अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे ७ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका युवकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.