Latur News: अडचणीत मदतीला धावणारी उदगीरची शिक्षक पथसंस्था; वर्ष १९७८ पासून उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची अर्थवाहिनी

Financial Assistance for Teachers Financial Assistance for Teachers: १९७८ पासून शिक्षकांना कर्ज व आर्थिक मदत पुरवित आहे. कन्यादान योजना, शैक्षणिक कर्ज, तातडीचे कर्ज व QR कोड सेवा यासह संस्था आधुनिकतेच्या मार्गावर विश्वासार्ह आर्थिक सहाय्यक ठरली आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

ऋषींच्या वास्तव्याने पवित्र असलेल्या आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उदगीरनगरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उद‌गीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. उद‌गीर, देवणी, जळकोट या तीन तालुक्यांत ही पतसंस्था लोकाभिमुख म्हणून उदयास आली आहे.

शिक्षकांच्या अडीअडचणीला मदत करणारी ही पतसंस्था शिक्षकांची अर्थवाहिनी बनली आहे. ही पतसंस्था ता. १५ जून १९७८ रोजी स्थापन झालेली असून तेव्हापासून आजतागायत सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांनी पतसंस्थेच्या हितासाठी निर्णय घेतल्याने या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com