

Devotees gather at the Tuljabhavani Temple in Tuljapur during the Diwali holiday period.
esakal
तुळजापूर,: दिवाळीच्या सुट्यांमुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थानला तब्बल ३ कोटी ५४ लाख ३० हजार ३७७ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अद्याप शालेय सुट्या संपलेल्या नसल्याने भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.