

Umaraga News
esakal
उमरगा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस गावांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, करडई, ज्वारी पिकासह आंबा, पपई, कलिंगड फळबागांचे नुकसान झाले आहे. काही मोजक्या ठिकाणी गारपिटीने पिकांसह बागायती पिकांचे, फळांचे नुकसान झाले आहे.