Umarga: विकासाभिमुख नेतृत्व आमदार ज्ञानराज चौगुले यांना विजयी करा; बसवराज पाटीलांचे आवाहन

Umarga: विकासाभिमुख नेतृत्व आमदार ज्ञानराज चौगुले यांना विजयी करा; बसवराज पाटीलांचे आवाहन

Marathwada News: आमदार चौगुले यांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहुन धर्मनिरपेक्ष भावनेतुन मतदार संघात विविध योजनेतुन १८०० कोटी रुपये मंजूर केले.
Published on

Political News: राज्यातील महायुती सरकारने लोकाभिमुख काम केले आहे. पंधरा वर्षाच्या कालखंडात  आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्व समाज घटकांना न्याय देत विकास कामाचा मनोरा उभा केला आहे, मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी त्यांचे नेतृत्व भविष्यकाळासाठी महत्वाचे असुन मतदारांनी आमदार चौगुले यांना पुन्हा एकदा विजयाची संधी द्यावी. असे आवाहन भाजपाचे नेते, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले.

उमरगा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराचा समारोप सोमवारी (ता.१८) उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात झाला. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते.

Umarga: विकासाभिमुख नेतृत्व आमदार ज्ञानराज चौगुले यांना विजयी करा; बसवराज पाटीलांचे आवाहन
Umarga Accident : दोन दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू; दोन तरुण गंभीर जखमी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com