

Dharashiv News
esakal
उमरगा: शहरात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाचा कारभार किरायाच्या इमारतीत सुरू आहे; मात्र आता पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या चार मजली मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीचे ठरणारे विविध सात कार्यालय मुख्य प्रशासकीय इमारतीत लवकरच स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.