
पहिल्या दिवशी ३५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांच्या निगेटिव्ह अहवालामुळे शाळेचा परिसर पॉझिटिव्ह
उमरगा (उस्मानाबाद): कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे तब्बल नऊ महिने बंद असलेल्या शाळा सोमवारी (ता.२७) सुरू झाल्या. एकूण संख्येपैकी दोनच शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद बरा होता. येणाऱ्या आठ दिवसांत विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
उमरगा शहर व तालुक्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद व खासगी शाळेची संख्या १२३ आहेत त्यापैकी शाळेच्या पहिल्या दिवशी १२० शाळा सुरू झाल्या. शहरातील भारत विद्यालय, आदर्श विद्यालय, कु. माधव चालुक्य विद्यालय, शरणाप्पा मलंग विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, के.डी. शेंडगे इंग्लिश स्कुल, महात्मा बसवेश्वर विद्यालय यासह जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या किलबिलाट दिसून आला.
Crime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक
एकूण सोळा हजार ३८० विद्यार्थी संख्येपैकी पहिल्या दिवशी पाच हजार ८१२ विद्यार्थी हजर होते. दरम्यान एकुण ४९२ शिक्षकांची संख्या आहे. कोरोना चाचणीत दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले होते. निगेटिव्ह शिक्षकांची संख्या सर्वाधिक असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मिळलेला प्रतिसाद ३५ टक्के असली तरी येणाऱ्या कांही दिवसात पटसंख्या वाढेल असे गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे, प्रशासनाला दिल्या...
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि संमतीपत्र !
शाळेच्या पहिल्या दिवशी शहर व तालुक्यातील १२० शाळा सुरू झाल्या. प्रवेशद्वारावर हात धूण्याची सोय, ऑक्सिमिटरने तपासणी आणि मास्क व सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र बॉटल असे चित्र सर्वत्र दिसत होते. पालकांची समंती पत्र आवश्यक असल्याने पाल्याचा उत्साह पाहुन पालक शाळेत येऊन संमतीपत्र लिहुन देत होते.
(edited by- pramod sarawale)