

Justice for Elderly Mother: SDM Umarga Orders Four Sons to Pay Monthly Maintenance
sakal
उमरगा : ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने लागू केलेल्या 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७' या कायद्याचा प्रभावी वापर उमरगा येथील उपविभागीय कार्यालयाने केला आहे.
मुरूम (ता. उमरगा) येथील एका प्रकरणात सुनावणी घेत उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी दत्तु शेवाळे यांनी बुधवारी (ता.एक) वृद्ध आईला दरमहा १२ हजार रुपये निर्वाह भत्ता (पोटगी) देण्याचे आदेश त्यांच्या चारही मुलांना दिले आहेत.