esakal | उमरगा आगाराला एका दिवसात तीस हजाराचे उत्पन्न, ८१४ प्रवाशांनी केला प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

bus

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने आंतरजिल्हा बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरूवारी (ता.२०) एका दिवशी २१ बसफेऱ्यातून जवळपास तीस हजारांचे उत्पन्न उमरगा आगाराला मिळाले.

उमरगा आगाराला एका दिवसात तीस हजाराचे उत्पन्न, ८१४ प्रवाशांनी केला प्रवास

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने आंतरजिल्हा बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरूवारी (ता.२०) एका दिवशी २१ बसफेऱ्यातून जवळपास तीस हजारांचे उत्पन्न उमरगा आगाराला मिळाले. साडेचार महिन्यात पहिल्यांदाच एका दिवशी एवढे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान २२ मे पासुन काही मार्गावर बस सुरू केल्या होत्या.

कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर फेऱ्यामध्ये व्यत्यय आल्याने तेव्हा २३ दिवसांत कालावधीत आगाराला एक लाख ४१ हजार ५१७ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. आता आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्याने आगाराला उत्पन्नाची अपेक्षा निर्माण झाली आहे. टाळेबंदीमुळे बस वाहतूक पूर्णतः विस्कळीत होती. कोट्यावधी रुपयांचे आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

वाचा : बीड जिल्ह्यातील ६७ प्रकल्प भरले तुडूंब, चार वर्षांत प्रथमच दमदार पाऊस

मध्यंतरी जिल्हाअंतर्गत बस सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त पाचशे रुपयांचे आर्थिक उत्पन मिळाले होते. आठ जूनच्या २१ बसफेऱ्यातून केवळ अकरा हजार ८७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मालवाहू बसलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर गुरुवारी लातूरला सात सोलापूर तीन, अक्कलकोट तीन, उस्मानाबाद दोन, कंटेकूर दोन, डिग्गी दोन, निलंगा एक तर दाळिंब-माकणी एक अशा २१ फेऱ्यातून ८६५ प्रवाशांनी प्रवास केला त्यातून जवळपास तीस हजाराचे उत्पन्न मिळाले.टाळेबंदीमुळे बससेवेला व्यत्यय आला. आंतरजिल्हा बसफेऱ्या सुरू झाल्याने उत्पन्न अपेक्षित आहे. गुरूवारी पहिल्या दिवशी संततधार पावसामुळे जेमतेम प्रवाशी होते. प्रवाशी वाढत राहिले तर फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवाशांची साथ महत्त्वाची आहे. बससेवा सुरक्षित असून प्रवाशांनी अखंडीत सेवा परंपरेला सहकार्य करावे.
-  पी.व्ही.कुलकर्णी, आगारप्रमुख, उमरगा
 

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top