उमेद'मुळे 'ती'च्या कर्तृत्वाला मिळाली लॉकडाऊनमध्ये भरारी

file photo
file photo

परभणी : ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अर्थात उमेद च्या महिला बचत गटांनी लॉकडाऊनला संधी मानत मोठी आर्थीक भरारी घेतली स्वकतृत्व सिध्द केले आहे.मास्क,भाजीपाला,फळे,कडधान्य विक्री करत ४२ लाख १७
हजार ३४९ रुपयाचा निव्वळ नफा या गटांना झाला असून त्यांनी चालती फिरती बाजारपेठ निर्माण करत स्त्रीशक्तीचा खऱ्या अर्थाने जागर केला आहे.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात झाल्यानंतर  राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या नावाने हे अभियान राबविले जात असताना त्याचे ‘उमेद’ असे नामकरण करण्यात आले. ‘उमेद’ ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट.

‘उमेद’ असेल तर माणूस पुन्हा उभं राहू शकतो. याच ‘उमेद’ने लाखो स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली. त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले.‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. यामध्ये गरिबी निर्मूलनाचा समग्र विचार करण्यात आला असून समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा यात समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात या उमेद अंतर्गत ७०४ ग्रामपंचायतीपैकी ६४४ ग्रामपपंचायतीमध्ये १० हजार ७५१ बचत गट स्थापन झाले आहेत.त्यामध्ये एक लाख सात हजार ७५३ महिला कार्यरत आहेत.उमेदचे काम जोरात असताना मार्च महिण्यात लॉकडाउन झाल्याने अनेक व्यवसाय ठप्प झाले.परंतु नावातच उमेद असल्याने या अभियानाने लॉकडाऊनला संधी मानत मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.

कोरोनामुळे सर्वांना मास्क घालने अनिवार्य झाल्याने राज्यभरात मास्कची मोठी मागणी वाढली.त्यामुळे अनेकांनी मास्क निर्मीतीला प्राधान्य दिले.त्यात उमेदच्या महिला बचत गटांची समावेश झाला. परभणी जिल्ह्यातील 48 गटातील 585 महिलांनी मास्क ४० हजार ४३१ एवढे मास्क निर्मीती करुन ते विक्री केले. त्यातून चार लाख ९७ हजार २८६ रुपये जमा झाले.लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत भाजीपाला विक्री सुरु होती.अशा वेळी उमेदच्या महिला बचत गटांनी पुढे येत भाजीपाला विक्री सुरु केली.

तब्बल २४१ गटांनी यात सहभाग घेत लॉकडाऊन सुरु झाले तेव्हापासून ता. २६ मे पर्यंत तीन हजार ६५ क्विंटल भाजीपाला विक्री केला. एकुण उलाढाल ३९ लाख ७७ हजार ६२१ रुपयाची झाली. त्यातून निव्वळ नफा १४ लाख ४४ हजार २९१ रुपये मिळाला. फळे विक्रीमध्ये महिलांनी मोठी उलाढाल केली आहे. ८११ क्विंटल फळे विक्रीमध्ये १० लाख ६३ हजार ३६१ रुपयाची उलाढाल होऊन दोन लाख ४८ हजार २२० रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

कडधान्य विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला असून ६३ लाख ७६ हजार १६३ रुपयांच्या कडधान्य उलाढालीतून २० लाख २७ हजार
५५२ रुपयांचा नफा बचत गटांना झाला आहे तुर,मुग,उडीद,सोयाबीन,बाजरी आदींची विक्री केली.

उमेदच्या माध्यमातून महिलांना स्वंयरोजगाराची संधी निर्माण झाली आहे.गटातून उत्पादन,विक्री करण्यास सोईचे ठरत आहे.जास्तीत गट स्थापन करणे, त्यांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.                                        - प्रताप सवडे, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा


उमेदच्या गटानी लॉकडाऊन मध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद असून मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.गटाच्या मास्क,भाजीपाला,कडधान्यास मोठी मागणी वाढली असून एक बाजारपेठ निर्माण झाली आहे.-
- संदिप भालेराव, व्यवस्थापक, तालुका अभियान पंचायत समिती परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com