Dharashiv News

Dharashiv News

esakal

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Long Queues Outside Gas Agencies in Umerga: उमरगा येथे गॅस सिलिंडर मिळण्यास उशीर होत असल्याने एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर मिळण्यासाठी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कुटुंबांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
Published on

उमरगा: अमेरिका-इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असला तरी त्यात थोडा विलंब लागत आहे. ग्राहकांमध्येही सिलिंडर मिळणारच नाही, असा संभ्रम निर्माण झाल्याने ग्राहक संबंधित एजन्सीच्या बाहेर गर्दी करत आहेत. एरवी बुकिंग केल्यानंतर दोन-तीन दिवसांत मिळणारे सिलिंडर आता पंधरा-पंधरा दिवस उलटूनही मिळेनासे झाले आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने ‘चुलीवर स्वयंपाक करण्याची’ वेळ गृहिणींवर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com