Beed News : विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाने संपवले जीवन
Emotional Note : बीडमधील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाने जीवन संपवले. भावनिक पोस्ट लिहिली. आपल्या मुलीला उद्देशून त्यांनी जीवन संपवण्याच कारण सांगितले असून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
बीड : शहरातील स्वराज्यनगर भागात एका शिक्षकाने भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला. शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारातच गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.