धाराशिव : अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करून या गुन्ह्यातील चार संशयितांना अटक करण्यात धाराशिवच्या पोलिस पथकाला यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या खुनाचा उलगडा केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी (ता.२५) पत्रकार परिषदेत दिली.