Parli News : रांगोळीतून बाबासाहेबांच्या ३२ पदव्यांची माहिती; परळी वैजनाथ येथे स्मारक परिसरात जयंती उत्सव समितीचा अनोखा उपक्रम
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : परळी वैजनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३२ पदव्यांची माहिती रंगीबेरंगी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जयंती उत्सवात या अभिनव उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
परळी वैजनाथ : शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.