Thergaon Bail Pola Celebration
sakal
पाचोड - सर्वत्र पोळ्याच्या दिवशी बैलाची मिरवणूक काढुन वेशीतून मान घेण्याची रीत जूनी असली, तरी ज्यांनी कोणी या सणाला आपला बैल प्रथम वेशीतुन नेऊन मान घेतला त्याच्या दावणीला बैल राहत नसल्याच्या अपशकुनाने वेशीतुन प्रथम कुणी जाण्यास धजावत नाही. व त्यामुळे गत साठ वर्षापासुन पोळ्याचा मान ग्रामदेवतेला नवसापोटी सोडलेल्या 'कठाळ्या'ला दिला जात असल्याने 'कठाळ्या' गावात सर्वधर्मसमभावाचा प्रतीक अन् पोळ्याचा मानकरी बनल्याचे चित्र पैठण तालुक्यातील थेरगाव येथे पाहवयास मिळते.