
बीड : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा कारागृहाची एक अनोखी परंपरा आहे. १९५७ पासून ती पाळली जात असल्याचीही नोंद आहे. पोळा सणाच्या दिवशी कारागृहातील बैलांची मिरवणूक काढून ती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाते, अशी ही परंपरा. त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी कारागृहातील सर्जा-राजाची मिरवणूक काढून ही परंपरा पाळली.