सिल्लोड - आरक्षण मिळविण्यासाठी एकजूट महत्वाची आहे. आपली मुले आपली संपत्ती आहे. त्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे नेत्यांची हाजी हाजी करणे सोडून मुलांच्या शिक्षण, नोकरी याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. धानोरा (ता.सिल्लोड) येथे आयोजित करण्यात आलेल्या चावडी बैठकीत ते बोलत होते.