स्थायी समितीच्या सभापतीपदी गुलमीरखान

 नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार.
नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार.

परभणी : महापालिकेच्या सर्वच्या सर्व सभापती पदांच्या निवडणूका अखेर बिनविरोध झाल्या. शनिवारी (ता.एक) पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सभापतींच्या नावांची घोषणा केली.
 
बी. रघुनाथ सभागृहात शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीसह तीन प्रभाग समितीच्या व सात विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सभेचे शनिवारी (ता. एक) आयोजन करण्यात आले होते. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पी. शिव शिंकर तर यावेळी आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सुरवातीला जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी प्रत्येक सभापतीपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याचे व सर्व अर्ज वैध असल्याचे सांगीतले तसेच उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी १५ मिनीटांचा कालावधी दिला. त्या दरम्यान, एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे प्रत्येक सभापतीपदाची बिनविरोध झाल्याचे श्री. शिवशंकर यांनी स्वतंत्रपणे जाहीर केले.  सुरवातीला स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेस पक्षाचे गुलमीरखान कलंदरखान यांची निवड जाहिर झाली. त्यानंतर प्रभाग समिती अच्या सभापतीपदी काँग्रेसच्या श्रीमती राधिका शिवाजी गोमचाळे यांची, प्रभाग समिती ‘ब’ च्या सभापतीपदासाठी अपक्ष सय्यद समरीन बेगम फारुख यांची तर प्रभाग समिती ‘क’ च्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नम्रता संदीप हिवाळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गलिच्छ वस्ती निर्मुलन, घरबांधनी व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाचे नागेश सोनपसारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या माधुरी विशाल बुधवंत, स्थापत्य समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळण रामचंद्र रोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदी अब्दुल कलीम अब्दुल समद, विधी व महसुल वाढ समितीच्या सभापतीपदी ॲड. अमोल पाथ्रीकर, शहर सुधार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या शेख फरहत सुलताना शेख अ. मुजाहेद तर माध्यमिक, पुर्वमाध्यमिक तांत्रिक समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास लंगोटे यांच्या नावाची घोषणा झाली. 

 सर्व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार 
 सर्व नवनिर्वाचित सभापतींचा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, आयुक्त रमेश पवार यांनी स्वागत केले. तसेच महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, शिवसेनेचे गटनेते चंद्रकांत शिंदे, माजी सभापती सुनिल देशमुख व सचिन देशमुख आदींनी सर्व सभापतींना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सभागृहबाहेर नवविर्वाचित सभापतींचे समर्थक, नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. फटाक्याची आतिशबाजीदेखील यावेळी करण्यात आली. 

उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न
महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करु. सध्या उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी परिस्थिती असून त्याबाबत उपाययोजना केल्या जातील. तसेच शहरात नविन पाणीपुरवठा योजनेवरून पाणी वितरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. 
गुलमीरखान कलंदरखान, स्थायी समिती सभापती, महापालिका, परभणी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com