

केज : आडस परिसराला वीजांचा कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी आकाशातून वीज कोसळून लिंबाच्या झाडाखाली असलेल्या शेतकऱ्यासह गाय जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.०३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास केकाणवाडी शिवारात घडली.