

Stormy Havoc: Sudden Unseasonal Rain Destroys Urus Festivities in Ranjangaon Khuri
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन, ता. पैठण : पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या हजरत शहा सिकंदर बाबा यांच्या उरुसादरम्यान शनिवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. काही क्षणांतच संपूर्ण यात्रा परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी स्टॉल, रहाट पाळणे, खेळणी व तंबू कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.