पाचोड - अचानक मंगळवारी (ता.२०) दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होऊन क्षणात शेकडो फळबागासह कच्ची घरे, विजेचे खांब, विविध झाडे, शेडनेट उध्वस्त झाल्याची घटना पाचोड (ता .पैठण) परिसरात घडली. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.