
जालना : जिल्हात मागील चार ते पाच दिवसांपासून अवकळीचे थैमान सुरू आहे. दररोज अचानक विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे फळबागधारक शेतकरी धास्तवले आहेत. तसेच लग्न सोहळ्याला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, जाफराबाद तालुक्यता सोमवारी (ता.१९) विजेचा कडकडाट, वादळी वारे, अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घरचा रस्ता धरणे पसंत गेले.