छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून शनिवारी धाराशिव जिल्हा वगळता बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वीज कोसळून विविध ठिकाणी चार जण जखमी, तर दोन जण मृत पावले आहेत..दिवसभर ढगाळ वातावरण होतो. काही जिल्ह्यांत दुपारी तर काही भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाचा जोर सर्वत्र कमी होता. सेलू शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून प्रत्येकी एक जण ठार झाला. या पावसामुळे मे महिन्यात हवामानात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी सुरू केली आहे..Crime News : जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; पिशोरमध्ये युवकाचा खून.पार्डी पोहकर येथे महिला ठारहिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पार्डी पोहकर (ता. सेनगाव) येथे शेतात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर जांब आंध येथे चौघे जण जखमी झाले आहेत. हत्ता व खडकी येथे तीन गायी दगावल्याची घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे मुक्ताबाई गिरी (वय ४०) या शेतात काम करीत होत्या. यावेळी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. पाऊस येत असतानाही त्या घरी का आल्या नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता, त्यांचा मृतदेह एका झाडाखाली आढळून आला. जांब आंध येथे शेतात वीज कोसळून रुख्मीना मनोहर बंदुके, अंकिता संतोष बोडखे, संतोष किशन बोडखे, नंदाबाई किसन बोडखे हे जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. .Domestic Violence : पत्नीला मारहाण, खुनाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल.दरम्यान, सेनगाव तालुक्यातील खडकी येथे एक गाय दगावली, तर हत्ता येथे गोशाळेजवळ वीज कोसळल्यामुळे दोन गायी दगावल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे दिगंबर बेले यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. यामध्ये एका टिनपत्रामुळे बैल जखमी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे दुपारी चार वाजेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. या दरम्यान शहरातील रहिवासी असलेले शेतकरी अजगर खान मियॉं खान (वय ६२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला..सेलूत पाणीच पाणीसेलू शहरासह तालुक्यातील अनेक भागांत शनिवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह दीड तास जोरदार पाऊस बरसल्यानंतर सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिवारी शहरातील आठवडे बाजारात पावसाने दाणादाण उडविली. आठवडे बाजार व पोलिस ठाण्यादरम्यान रस्त्यावरून पुरासारखे पाणी वाहत असल्याने बाजारातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने नागरिक, शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. विवाह सोहळ्यात पावसाचे विघ्न येत असल्याने वऱ्हाडींचा हिरमोड होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.